औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख
सोयगाव : तालुक्यातील जवळ असलेले जामनेर तालुक्यातील पिंपळगाव येथील निवांत ढाब्याच्या समोर रोडवरच दोन दुचाकी स्वारांचा मोठ्या प्रमाणात अपघात घडला असून या भीषण अपघातामध्ये सांडू हुसेन शेख वय 55 रा. सावळदबारा, तर मनोहर पांडुरंग दांडगे, रा. दाभा, ता. सोयगाव या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मोसीम सांडू शेख रा. सावळदबारा व संजय हरदास जाधव रा. जामठी ता. सोयगाव या दोघांना जोरदार मार लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली जात आहे. तर गेल्या सहा महिन्यांपासून राज्य महामार्ग 44 वर देऊळगाव गुजरी पासून तर जामनेर पर्यंत कुठल्याही प्रकारचे स्पीडब्रेकर नसून ग्रामीण भागातल्या वाहनधारकांना आपला वेग सावरता येत नाही म्हणून असे मोठे मोठे अपघात आतापर्यंत घडलेले आहेत यासाठी गावापरत स्पीड ब्रेकर नक्कीच पाहिजे अशी चर्चा सुद्धा ग्रामस्थांनी घटनास्थळी केली आहे.