मधापूरीच्या ५८ वर्षीय महिलेने गळफास घेऊन जीवन यात्रा संपविली...!

 


 मूर्तिजापुर - तालुक्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीतीत धक्कादायक घटना कुरूम पोलीस चौकी अंतर्गत येत असलेल्या मधापूरी येथील महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २३ डिसेंबर रोजी ७.३० वाजताच्या दरम्यान घडली.

       कुरूम पोलीस चौकीच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मधापुरी येथील रहिवासी सरस्वती किसननाथ पवार वय ५८ वर्ष या महिलेने राहत्या घरी नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली असता, कुरूम पोलीस चौकीच्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.मृतक महिलेच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे. घटनेचे नेमके कारण समजू न शकल्याने सदर प्रकरणी माना पोलीस स्टेशन मध्ये मृतक महिलेचा मुलगा अतुल पवार यांच्या फिर्यादीवरून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास माना पोलीस स्टेशनचे

ठाणेदार कैलास भगत यांच्या मार्गदर्शनात कुरुम बीटचे हेड

कॉन्स्टेबल तेजराव तायडे, पोलीस कॉन्स्टेबल महेश पिंजरकर करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post