नंदुभाऊ लवंगे यांच्या नेतृत्वामध्ये धनगर समाज आरक्षणाबाबत राजेंद्र गावितच्या निषेधार्थ आंदोलन

 





बुलढाणा/भीमराव खंडारे :- बुलढाणा येथे धनगर समाज बांधवांनी नंदूभाऊ लवंगे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत विरोध करणाऱ्या मंत्र्याचा पुतळा करून जाहीर निषेध यावेळी केला आहे तसेच चपला- जोडे यावेळी पुतळ्याला मारण्यात आले. पोलीस प्रशासन यावेळी सतर्क झाले होते. संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयावर किंवा ज्या ठिकाणी SDO कार्यालय असेल त्या ठिकाणी धनगर समाज बांधवांनी धनगर समाज आरक्षणाला विरोध करणारा मंत्री राजेंद्र गावितच्या जाहीर निषेधार्थ जोडे- चपला मारो आंदोलन करणे आवश्यक आहे. नाहीतर ही व्यवस्था धनगर समाज आरक्षणाला असेच विरोध करत राहणार, असे नंदूभाऊ लवंगे यांनी वक्तव्य केले आहे. संविधाना आधारे आरक्षण मिळालेले आहे,पण आरक्षणाची अंमलबजावणी या राजकीय नालायक व्यवस्थेमुळे होत नाही. त्यामुळे पंच्याहत्तर वर्षापासुन धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे आणी आजही ही नालायक व्यवस्था धनगर समाजाला व धनगर समाज आरक्षणाला विरोध करतात. यासाठी समाज बांधवांनी गट तट, पक्ष, नेता, बाजूला सारून धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी एकत्रित येणे आवश्यक आहे. समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारे जे काही महाराष्ट्रात समाज परिवर्तन करणारे समाज बांधव असतील परिवर्तनासाठी पुढे करुण मोठ्या ताकदीनिशी साथ देणे महत्त्वाचे आहे असे आश्वासन धनगर समाज युवा कार्यकर्ते गजानन दिवनाले यांनी यावेळी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post