उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अवर सचिव राजेंद्र खंडारे यांची अंध शाळेला सदिच्छा भेट




            सुविद्या बांबोडे सहायक संपादिका 


    आनंद अंध विद्यालय, आनंदवन या अंध विद्यार्थ्यांच्या नवनाविण्य सृजनात्मक असे वेगवेगळे उपक्रम राबवित असल्याने ही शाळा जिल्ह्यात नावारुपास आलेली आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अनेक राज्यस्तरावरचे विविध पुरस्कार प्राप्त करीत एक आगळी-वेगळी ओळख निर्माण केली असल्याने या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अवर सचिव राजेंद्र खंडारे यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटी प्रसंगी त्यांनी अंधांच्या शैक्षणिक ब्रेल लिपीतील पुस्तकांची पहाणी केली.




 

   ब्रेल साहित्य किटचे ग्रंथालय वर्ग, संगीत वर्गाची सुध्दा पहाणी केली. तसेच प्रार्थना सभागृह व हस्तकला वर्गात असलेल्या अंध विद्यार्थ्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांवरील प्लेक्स छायाचित्र प्रतिमांचे चित्र प्रदर्शन बघून अंध विद्यार्थ्यांच्या कला कौशल्याच्या उपक्रमांबद्दल कौतुक करून शाबासकीची थाप दिली. यावेळी त्यांच्या समवेत चंद्रपूरचे तहसीलदार मा. पांडुरंग माचेवार साहेब,राजेश ताजने उपस्थित होते. अवर सचिवांनी शाळेला भेट दिल्या प्रसंगी अंध शाळेचे मुख्याध्यापक सेवक बांगडकर, कलाशिक्षक परमानंद तिराणिक, विशेष शिक्षक कृष्णा डोंगरवार, जेष्ठ शिक्षिका साधना ठक, वर्षा उईके, तनुजा सव्वाशेरे, विलास कावणपुरे, राकेश आत्राम इत्यादी शिक्षक वृन्द व शिक्षिकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीने अंध विद्यार्थ्यांनी रंगीत कागदापासून तयार केलेल्या कागदी पुष्प देवून स्वागत केले.

Post a Comment

Previous Post Next Post