नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची सिटीझन वेल्फेयर असोसिएशनच्या सदस्यांनी घेतली सदिच्छा भेट

 

बदलापूर : ग्रामीण पोलीस स्टेशनचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरुण क्षीरसागर यांची सदिच्छा भेट आज सिटीझन वेल्फेयर असोसिएशनच्या सदस्यांनी घेतली. बदलापूमधील गुन्हेगारी, नागरिकांची सामाजिक व व्यक्तिगत जबाबदारी यावर साधक बाधक चर्चा झाली. नागरिकांनी किमान स्वतःची काळजी घेतल्यास चेन स्नेचिंग, आणि इतर चोऱ्यांचे गुन्ह्यांना प्रतिबंध बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

यावेळी सिटीझन वेल्फेयर असोसिएशनचे सचिव राजेंद्र नरसाळे, सौ सुवर्णा इसवलकर,  गुरुनाथ तिरपणकर,  विलास हंकारे, निवृत्त पोलीस अधिकारी  दिलीप शिरसाठ, किशोर गुरव आणि डॉ. अमितकुमार गोईलकर आदी सदस्य उपस्थित होते. सिटीझन वेल्फेयर असोसिएशन कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी आवश्यक जनजागृती कार्यक्रमात पोलीस अधिकारी व कर्मचारी याना सर्वोतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही सचिव राजेंद्र नरसाळे यांनी अधिकाऱ्यांना दिली. बदलापूरमध्ये एक सक्षम अधिकारी म्हणून स्वागत आणि बदलापूमधील कायदा व सुव्यस्था चांगली मजबूत ठेवण्याचे चांगले काम नवीन पोलीस निरीक्षकांकडून घडावे यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

Previous Post Next Post