युनोत भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्याकरीता वर्ल्ड पार्लमेंट सर्वतोपरी प्रयत्न करणार - डॉ. ग्लेन टि मार्टिन.

 




श्रीरामपूर : - जगाच्या एकूण लोकसंख्येच्या वीस टक्के लोकसंख्या भारताची असूनही संयुक्त राष्ट्र संघात भारताला कायम स्वरूपी सदस्यत्व नाही. संयुक्त राष्ट्रसंघाच्या उभारणीत भारताचा मोठा वाटा असून भारताला या प्रकारची सापत्न वागणूक मिळणे हा एक प्रकारचा भारतावर अन्यायच आहे. शिवाय मोजक्या पाच देशांना व्हेटोचा अधिकार असल्याने इतर सदस्य देशांचा या संघटनेत समावेश असणे म्हणजे असूनही नसल्यासारखीच अवस्था असल्याचे प्रतिपादन वर्ल्ड पार्लमेंट अध्यक्ष प्रा.डॉ. ग्लेन टि मार्टिन यांनी व्यक्त केले आहे.



           श्रीरामपूर येथील खासदार गोविंदराव आदिक सभागृहात वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन (डब्ल्यूसीपीए) अर्थात जागतिक संविधान व संसद संघ यांनी आयोजित केलेल्या " वर्ल्ड पार्लमेंट इंटर नॅशनल अवॉर्ड " च्या वितरण समारंभाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

            याप्रसंगी वर्ल्ड पार्लमेंटचे उपाध्यक्ष प्रा. नरसिंहा मुर्ती यांनी वर्ल्ड पार्लमेंट भारताच्या राज्यघटनेचा सर्वतोपरी आदर, सन्मान व पालन करून आपले मार्गक्रमण करील असे स्पष्ट केले. याप्रसंगी दिल्ली चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. राकेश छोकर, महाराष्ट्र राज्य संपादक संघाचे अध्यक्ष  प्रकाश कुलथे यांनीही आपले विचार मांडत डब्ल्यूसीपीएच्या कार्याचा गौरव केला.

           भारतीय शास्त्रात व धर्मात अनन्यसाधारण महत्व असलेल्या तुळशीला जलार्पण करून मान्यवरांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले. डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती आपल्या प्रास्ताविकात दिली. अध्यक्षीय सुचना प्रा.नागेश हुलावळे यांनी तर अनुमोदन प्रा. अरूण सावंग यांनी केले.

वर्ल्ड पार्लमेंट सदस्यत्व प्रदान 

"अर्थ कॉन्स्टीट्यूशन " या मुळ इंग्रजी ग्रथांच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन या प्रसंगी करण्यात आले. कोणत्याही भारतीय भाषेत या संविधान ग्रथांचे भाषांतर करण्याचा मान मराठी भाषेला प्रथम मिळाला. डॉ. दत्ता विघावे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे येथील प्रा.नागेश हुलावळे, डॉ. प्राची बामणे, प्रा. अॅड. तेजल वैती यांनी अनुवादनाचे काम केले. त्यांचाही याप्रसंगी यथोचित सन्मान करण्यात आला.

             या प्रसंगी समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३३ पुरूष व १६ महिलांना " वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२२ " व "वर्ल्ड पार्लमेंट मेंबरशीप " देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये संगिता जामगे

(साहित्य) गंगाखेड, सतिश पवार

 (सामाजिक) पुणे, रे. फा. थॉमस डाबरे (बिशप) पुणे, प्रा.डॉ. वंदना केंजळे (शिक्षण, साहित्य व योगा) पुणे, डॉ. दिप्ती नेहर (साहित्य व सामाजिक) पुणे,

 श्री.कल्याणकस्तुरे शिवसंब (नांदेड, सामाजिक कार्य), शालीग्राम मानकर खामगांव - (बुलढाणा, शैक्षणीक व सामाजिक कार्य),श्रीमती. वसुधा नाईक-(पुणे, साहित्य, शैक्षणिक, सामाजिक कार्य), जे. सत्यनारायणराव जाधव ( हैद्राबाद. चित्रपट व पत्रकारीता.) श्री. रामचंद्र कपिले, (संगमनेर, सामाजिक, पत्रकारीता), श्रीमती.अन्वरी इजाज शेख

(गडचिरोली, सामाजिक कार्य.), मा. श्री. राहुल मघाडे ( खामगांव ,साहित्य व शैक्षणिक) ,प्रा.डॉ. घनश्याम पांचाळ, ( नांदेड, साहित्य व शैक्षणिक ), श्री.वाल्मिक वाघ,(पुणे, व्यवसाय), श्री.विठ्ठल सदाशिव पठाडे ( बुलढाणा -शैक्षणिक, सामाजिक व उत्थान ) श्री.विजय रणखांब

(नांदेड, सामाजिक कार्य व अध्यक्ष कामगार संघटना ), श्री. रविंद्र इंगळे (मुंबई, सांस्कृतिक व सामाजिक कार्य) डॉ. किशोर मारोती वानखेडे (खामगांव, ऐतिहासिक संशोधन, शैक्षणिक व सामाजिक ), डॉ. अलका भारत नाईक ( , मुंबई - साहित्य, शैक्षणिक, आरोग्य सेवा ), श्री. देशमुख बाबुराव (नाशिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य), डॉ. सुमित्रा पाटील, (कोल्हापूर - सामाजिक कार्य ), श्रीमती.शाहिस्ता परविन आयुब खान ( यवतमाळ, सामाजिक कार्य),. मनोज हिवरकर, (वर्धा, सामाजिक कार्य - पोलिस पाटील), .अशोक महादेव मोहिते (बार्शी, साहित्य व सामाजिक कार्य), श्रीमती. अर्चना गिरीष राहुरकर (अकोले, शिक्षण व सामाजिक कार्य), प्रल्हाद घोरबंड

(कंधार, नांदेड, समाज कार्य),

देवेंद्र वाघ (निफाड, नाशिक, साहित्य व शैक्षणिक ),  तुकाराम निवृत्ती निमगिरे (नवी मुंबई प्रेरक प्रशिक्षक, समुपदेशक आणि व्यवसाय सल्लागार ), . सुरेश कांबळे ( मुंबई -सामाजिक कार्य ), श्रीमती.सत्वशिला यादव (वाळुज, सोलापूर साहित्य व शैक्षणिक ), .डॉ. महेश थोरवे ( पुणे, साहित्य व शैक्षणिक), मा. श्री. मोहम्मद इलाही बागवान (उस्मानाबाद - चित्रकला), .व्याळीज दिपक (नाशिक - शैक्षणिक), मा. डॉ. दिव्यज्योती सैकिया (राष्ट्रीय मानवाधिकार आणि सामाजिक कार्यकर्ते. मानवतावादी आणि शांतता कार्यासाठी पुरस्कृत,आसाम,)

प्रा.डॉ. किरण अगतराव जगदाळे, सोलापूर, शिक्षण व सामाजिक कार्य), डॉ. सुनिल जाधव (परभणी - सामाजिक कार्य ), . किशोर वामनराव मुटे (वर्धा - पत्रकारीता व सामाजिक कार्य ),  लुनेश्वर रघुनाथ भालेराव (चिंचवड, पुणे, सामाजिक कार्य ,नितिन शिंदे (बदलापूर ईस्ट, ठाणे - सामाजिक कार्य ), अरूण गायकवाड (पुणे, व्यवसाय ), श्रीमती. माधुरी उदावंत (पुणे -सामाजिक कार्य), श्रीमती. सुरेखा कांबळे ( पुणे, सामाजिक कार्य),. अविनाश पोहेकर (श्रीरामपूर, सामाजिक कार्य ), प्रा.अक्षय कमलाकर तेलोरे, (श्रीरामपूर, साहित्य व शिक्षण), डॉ किरण जोशी (पुणे, वैद्यकीय सेवा -डॉक्टर). सौ.स्मिता लंगडे ( कोल्हापूर, समाजकार्य ) सौ. सुमित्रा पाटील ( कोल्हापुर सामाजिकार्य ) यांचा समावेश आहे. तर उत्कृष्ठ शिक्षण 

संस्थेसाठी अशोक ग्रामिण शिक्षण संस्थेचे आर्टस, वाणिज्य व विज्ञान कॉलेज अशोकनगर, या महाविद्यालयाची निवड करण्यात आली आहे.

याप्रसंगी वसुधा नाईक यांच्या "शब्द फुलांची ओंजळ " या पुस्तकाचे प्रकाशन तर डब्ल्यूसीपीएच्या विशेष बॅग,पॅड व स्लॅशचे अनावरण करण्यात आले.

             आकाशवाणाचे नैमित्तिक उदघोषण प्रसन्न कुमार धुमाळ यांनी मराठीत व प्रा.अॅड. आदिनाथ जोशी यांनी इंग्रजीत सुत्रसंचलन करून कार्यक्रमात बहार आणली.

             डॉ. सिमा वाघेला, डॉ. अलका नाईक, प्रल्हाद घोरबंड, शाहिस्ता परविन खान, तुकाराम निमगिरे, संगीता जामगे, राहुल मघाडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले

            कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. दत्ता विघावे यांच्याशिवाय सचिव प्रा. अरूण सावंग, सहसचिव ऋषिकेश विघावे, खजिनदार चिंतामण भोसले, सदस्य प्रा. अक्षय तेलोरे, पवन लांबोळे, अकबरभाई सय्यद यांनी महत्वाचे योगदान दिले.

Post a Comment

Previous Post Next Post