गावाकडची बातमी सादिक शेख सह ब्युरो रिपोर्ट औरंगाबाद
सोयगाव पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेलं पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर सरताळे यांचे सोमवारी रात्री पेट्रोलीग गस्त साठी बानोटी परिसरात कर्तव्य बजावत असताना अचानकपणे त्यांच्या छातीत दुखू लागल्याने सहकारी कर्मचारी यांनी त्यांना पाचोरा येथे खाजगी रुघ्नाल्यात धाखल केले असता डॉक्टर यांनी तपासून मयत झाल्याचे सांगितले.
हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले ,रात्री अचानक त्यांना छातीत त्रास होऊ लागल्यान ज्ञानेश्वर सरताळे यांचे अवघ्या ३५ व्या वर्षी निधन झाल्याने सोयगाव पोलीस ठाणे येथील सर्व पोलीस बांधव तसेच सर्व सोयगाव तालुकावासीय हळहळ व्यक्त करीत आहेत
तसेच त्याचा कर्तव्य मन मिळाऊ स्वभावाने सर्वाना आपलेसे वाटायचे त्यांचा अंतिम यात्रेत सोयगाव तालुक्यातील फरदापुर सोयगाव पंच क्रोशीतील व्यापारी राजकीय पत्रकार व तेली समाज अंतिम यात्रेत खूप मोटा जण समुदाय होता
त्यांच्या अंतिम यात्रेत पोलीस दलाने शासकीय इतमामात मान वंदना तीन फेरी झाडून देण्यात आली
ज्ञानेश्वर सरताळे यांच्या पश्चात आई-वडील भाऊ, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे त्यांचा एक मुलगा दोन वर्षाचा आहे त्यांच्यावर त्यांच्या राहत्या घरी वाकी खुर्द तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.