सृजन चंद्रपूर - एक महिना एक कार्यक्रम
गाव सहेली सुविद्या बांबोडे, चंद्रपूर - 'एक महिना एक कार्यक्रम 'या व्रताच्या अंतर्गत सृजन चंद्रपूर सलग 164 वा आणी सरत्या वर्षातील शेवटचा कार्यक्रम 'नो अतिथी सारे अतिथी' या शीर्षकांतर्गत उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला .रसिक वारकऱ्यांना अभिव्यक्त होता यावे ,त्यांना हक्काचा मंच मिळावा या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात संध्या दानव ,आहील गंगशेट्टीवार ,मो. बा .देशपांडे ,प्रदीप देशमुख ,ज्योती परहाटे ,संध्या विरमलवार ,वर्षा चौबे ,नीता कोतमवार ,मंदा पडवेकर ,किशोर मुगल ,भावना हस्तक ,मृणालिनी खाडिलकर ,प्राजक्ता उपरकर ,प्रशांत नवघरे ,जयश्री ढोमणे ,सीमा पाटील भसारकर ,मनीषा कोरडे ,देवराव ठाकरे ,अर्चना ठाकरे ,प्रीती नवघरे ,रोहिणी निले ,मंजूषा गड्डमवार आदी वारकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे आपला गायन ,नृत्य ,नकला अशा विविध कला सादर करीत एकमेकांशी मुक्तपणे गप्पा केल्यात .संगीता पीजदूरकर यांच्या संचलनाच्या अंतर्गत मधुसूदन उर्फ मदन पुराणिक यांनी या कार्यक्रमाचे यजमानपद भूषविले .हा वेगळ्या वाटेने जाणारा कार्यक्रम साऱ्यांना अतिथीचा फिल आणी आनंदाची अनुभूती देऊन गेला.