महाराष्ट्र ,देवेंद्र भोंडे : दिनांक 25/12/2022 रोजी इंटरनॅशनल इंटरशिप युनिव्हर्सिटी नवी दिल्ली यांच्याकडून वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा स्पोर्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांना डॉक्टरेट प्रधान करत असताना, इंटरनॅशनल इंटरशिप युनिव्हर्सिटी डिग्री प्रधान समारंभा प्रसंगी श्रीमती रोशनी लाल ट्रस्टी आय आयु , पियुष पंडित फाउंडर एस बी पी अँड आय आय यु व मिस हिरामणी रेस्क्यू रोमानिया, डॉ निधि बंसल मेंबर कोर कमिटी आदी मान्यवर व स्वतः निलेश विश्वकर्मा उपस्थित होते. विश्वकर्मा यांना ही डॉक्टरेट पदवी क्रीडा या विषयात मिळाली आहे .
डिग्री प्रधान समारंभ हा इंटरनॅशनल इंटरशिप युनिव्हर्सिटी कॅम्पस मध्ये नवी दिल्ली येथे पार पडला, युवकांचे प्रेरणा स्थान असलेले निलेश विश्वकर्मा यांना डॉक्टरेट मिळाल्याबद्दल महाराष्ट्रातील युवकांना स्फूर्ती मिळत आहे. निलेश विश्वकर्मा नेहमीच युवकांसाठी आयकॉन व्यक्तिमत्व आहे.
त्यामध्ये ही त्यांना कौतुकाची थाप एखाद्या नामांकित विद्यापीठातर्फे त्यांचा डॉक्टरेट पदवी प्रदान करून गौरव करण्या आल्याबद्दल महाराष्ट्रातील युवक कार्यकर्ते व तरुणांमध्ये नव चैतन्य जागृत होण्यास मदत होत आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या शिरावर मानाचा तुरा लावण्यासाठी हे त्यांचे कार्य उल्लेखनीय व गौरवशाली आहे या कार्याबद्दल निलेश विश्वकर्मा यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या...