राज्य स्तरीय स्पर्धेत दिव्या खोडका तीन स्पर्धेत प्रथम

 

           कोकण संपादक दिपक पाटील 

कोकण :  विधायक संसद - श्रमजीवी संघटनेने साने गुरूजी जयंती निमित्ताने दि.२४ डिसेंबर ते २६ डिसेंबर २०२२ राज्य स्तरीय बाल कला-क्रीडा सांस्कृतिक स्पर्धा २०२२ मध्ये महाराष्ट्र राज्यातील नाशिक ,पालघर, ठाणे या जिल्ह्यातील १४०० पेक्षा जास्त मुला मुलींनी सहभाग घेतला..


                    या मेळाव्या शहापूर तालुक्यातील कु.दिव्या मनिषा प्रकाश खोडका महिला मंडळ शाळा शहापूर येथील विद्यार्थी व मुळची गाव जुनवणी येथील रहिवासी असलेली आदिवासी कुटुंबातील या मुलींने उसगाव डोंगरी येथे विधायक संसद - श्रमजीवी संघटना आयोजित राज्य स्तरीय बाल कला-क्रीडा सांस्कृतिक स्पर्धा मेळावात सहभागी होऊन 

रांगोळी स्पर्धा 

चित्रकला स्पर्धा  

निबंध स्पर्धा या तिन्ही स्पर्धेत *प्रथम क्रमांक* मिळवून शहापूर तालुक्याचे चे नाव उंचावले आहे. 

सर्वच थरतुन् तिचे अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post