बदलापूर-हेंद्रेपाडा परिसरातील अंजलीनगर रहिवाशी संकुलातील रस्ता कीत्येक वर्ष काॅक्रीटकरणाच्या प्रतिक्षेत होता.ताप्तुर्ती थातुरमातुर डागडुजी व्हायची,व ब-याच वर्षांनी अंजलीनगर येथील रस्ता काॅक्रीट रस्ता होणार आहे.माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे व माजी नगरसेविका सौ.रुचिता घोरपडे यांच्या सततच्या पाठवुराव्यानी नगरपालिकेतील सर्व तांत्रिक बाबी पुर्ण करुन वर्क ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर नुकताच अंजलीनगर येथील रस्त्याचे भुमीपुजन माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे व माजी नगरसेविका सौ.रुचिता घोरपडे यांच्या श्रीफळ वाढवुन करण्यात आले.हा काॅक्रीट रस्ता अंजलीनगर ते शास्त्रीनगर असा असेल व दोन्ही बाजूला फेवरब्लाॅक असतील,असे राजेंद्र घोरपडे यांनी सांगितले.तसेच हा रस्ता एका महिन्यात पुर्ण केला जाईल असेही माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना येथील रहिवाशांना आश्वस्त केले.याप्रसंगी माहेरवाशिणच्या संचालिका प्रभा शिर्के,उद्योजक संजय पाटील यांनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच रहिवाशांच्यावतीने माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे व माजी नगरसेविका सौ.रुचिता घोरपडे यांचा अंजलीनगर येथील रहिवाशांच्यावतीने सत्कार करण्यात आला व आभार मानण्यात आले.याप्रसंगी अंजलीनगर येथील बंधु-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.