बुलढाणा/भीमराव खंडारे :- बाळापूर फैल खदान येथील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासुन हेतू परस्पर नगर परिषद खामगाव दुर्लक्ष करून त्यांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे, पिण्याच्या पाण्याच्या मूलभूत अधिकार असून यावर कुठेतरी शासन प्रशासन दुर्लक्ष करत आहे,त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत येत्या 15 दिवसात यावर प्रतिक्रिया लेखी स्वरूपात द्यावी तसेंच पाण्याचा गंभीर प्रश्नाची दखल घेतली जावी यासाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले तसेंच प्रश्न सोडवत करण्यासाठी तीन टप्प्या मध्ये आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी तथा नागरिकांनी दिला आहे.