चंद्रपूर,सुनिल कोसे, चिमूर : महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी युनियन चे नागपूर येथे दि 26 डिसेंबर ला भव्य राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन केले आहे सदर अधिवेशनात युनियन च्या विविध मागण्या प्रलंबित प्रश्न समस्या निवारण आणि अनेक मुद्यांना घेऊन जामठा स्टेडियम नागपूर अधिवेशन होणार आहे त्या अनुसंगाने महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी यूनियन 4511 तालुका चिमूर चे वतीने मा.गटविकास अधिकारी श्री राठोड याना नागपुर जामठा येथील दिनाक 26/12/2022 ला होणारे राज्यस्तरीय भव्य अधिवेशन बाबत निवेदन देण्यात आले .
सदर अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फड़नवीस , ग्रामविकास मंत्री गिरिश महाजन तसेच माजी कामगार मंत्री बचूं कडु यांचे उपस्थितीत होत आहे सदर राज्यस्तरीय अधिवेशनकरिता राज्यातील सर्व ग्राम पंचायत कर्मचारी सहभागी होत आहेत. ग्राम पंचायत कर्मचारी याच्या विविध मागण्या करिता शासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करूनही ग्राम पंचायत कर्मचारी याची उपेक्षाच केली गेली आहे त्या पार्श्वभूमीवर सदर राज्यस्तरीय अधिवेषणास महत्व प्राप्त झाले आहे.
सदर राज्यस्तरीय अधिवेशन ग्राम पंचायत कर्मचारी याच्या मागण्या ना न्याय मिळवून देणारे असेल. तरी चिमूर तालुक्यातील सर्व ग्राम पंचायत कर्मचारी यानी मोठ्या संखेनि सदर राज्यस्तरीय अधिवेशन करिता उपस्थित राहवे असे आव्हान ग्राम पंचायत कर्मचारी यूनियन चिमूर तालुका अध्यक्ष गोपाल गावतुरे व तालुका सचिव किशोर कामडी यानी केले आहे..