फर्दापूरात ३० वर्षानंतर पाणीपुरवठा योजना

 





 औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख


 औरंगाबाद..फर्दापूर गावात ३० वर्षानंतर पाणीपुरवठा योजना सुरू होत आहे या योजनेतून नळ कनेक्शन घेण्यासाठी ३५०० रुपये रक्कम ठेवण्यात आली आहे तातडीने नळ कनेक्शनसाठी ग्रामस्थांनी नोंदणी करावी असे आवाहन ग्रामपंचायतच्या वतीने केले आहे.

 फर्दापूर गावात कोणतीही पाणीपुरवठा योजना नव्हती त्यामुळे ग्रामस्थांना वर्षभर पाहण्यासाठी मोठी कसरत करावी लागायची खाजगी टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहवे लागते ग्रामपंचायतीच्या प्रयत्नाने शासनाने २०१९ मध्ये ९ कोटी रुपयाचा निधी मंजूर करून गावासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. तोंडापूर ( ता. जामनेर ) येथील मध्य प्रकल्पातून पाईपलाईन करून गावात पाणी आणले जाणार आहे ही पाईपलाईन पूर्ण झाली असून गावातही अंतर्गत पाईपलाईन करण्यात आली आहे.

 फिल्टर प्लांटचे बांधकाम पूर्णत्वात आले असून लवकरच गावाला पाणीपुरवठा केला जाईल असे ग्रामपंचायतच्या वतीने सांगण्यात आले नळ कनेक्शनसाठी प्रथम रक्कम भरून बुकिंग करणारे माजी पंचायत समिती सदस्य विजय तायडे यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 ग्रामविकास अधिकारी सुनील मगरूळे ग्रामपंचायत सदस्य फिरोज पठाण ग्रामपंचायत सदस्य शेख निसार ग्रामपंचायत सदस्य रवींद्र बावस्कर अजिज खा पठाण भीमराव बोराडे शेख जाकीर आदिची उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post