ऊस तोडणी कामगारावर काळाचा घाला

 




पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ऊस ट्रॅक्टर उजनी कालव्यात पलटी झाला आहे. या अपघातात तीन महिला आणि दोन बालकांचा मृत्यू झाला आहे . जखमींपैकी दोघांवर करकंब ग्रामीण रुग्णालयात तर एकावर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

करकंब येथील देशमुख आणि मदने वस्तीजवळील उजनीच्या 33 नंबर फाट्यावर ट्रॅक्टर पलटी झाला आहे . काहीजण त्या ट्रॉलीखाली अडकले होते. मृत मध्य प्रदेश येथील कोलकी (ता. वरला जि बडवाणी) येथील आहेत. मृतांमध्ये अरविंद कवशे (वय २ वर्षे), प्रिया नवल सिंग आर्या (वय १ वर्षे), विरसिंग आर्या, सुरेखा डावरे, सुनिता राजाराम कवशे यांचा समावेश आहे. तर ट्रॅक्टर चालक लहु खरे (रा. करता) यांच्यावर करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातातील एका जखमी महिलेचा सोलापूर येथील सिविल हाॅस्पिटलमध्ये मृत्यू झाला, तर करकंब येथील ग्रामीण रुग्णालयात दोन महिला आणि एक दोन वर्षाची मुलगी व एक मुलगा मृत झाला. तर तीनजण जखमी झाले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post