विचारांचा आरसा.
विचारात आरसा आहे म्हणून,तो किती सुंदर आहे
तो सुंदर आहे, म्हणून आरसा सुंदर आहे.....
विचारात सत्यता आहे, म्हणून भावना निर्मळ आहे
भावना निर्मळ आहे, जगणं सुंदर आहे....
संस्कारांत वाढला म्हणून,जगतो सुंदर आहे
सोबतीला मित्र चांगले म्हणून, व्यक्तिमत्त्व छान आहे...
व्यक्तिमत्त्व छान म्हणून, ध्येय ठरवले आहे
जिद्दीने प्रयत्न केला म्हणून, यशस्वी ठरला आहे.....
यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला, म्हणून सफल ठरला आहे
सफल ठरला म्हणून, यशाचं शिखर काबीज केल आहे.....
सौ शारदा अतुल भुयार, कारंजा लाड जिल्हा वाशिम