कलबुर्गी - कोल्हापूर – कलबुर्गी रेल्वेस सांगोल्यात थांबा मिळावा - शहीद अशोक कामटे संघटना

 




विशेष प्रतिनिधी सोलापूर 

सांगोला : शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने कलबुर्गी- कोल्हापूर - कलबुर्गी रेल्वेस सांगोल्यात थांबा द्यावा या मागणीचे निवेदन सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ मंडल परिचालन प्रबंधक प्रदीप हिरडे यांना संघटनेच्या वतीने स्मरणपत्र क्रमांक २ देण्यात आले आहे.गाडी क्रमांक अप डाऊन २२१५५- २२१५६ दैनंदिन कलबुर्गी- कोल्हापूर - कलबुर्गी रेल्वेस रेल्वे विभागाकडून सुरू करण्यात आली आहे, त्यामध्ये सांगोला रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आलेला नाही यापूर्वी या मार्गावर सोलापूर- मिरज एक्सप्रेस धावत होती कोरोनामुळे गेल्या तीन वर्षापासून ही रेल्वे बंद होती रेल्वे विभागाने कामटे संघटनेची व येथील प्रवाशांची वाढती मागणी पाहता थेट दररोज कलबुर्गी ते कोल्हापूर ४ महिन्यापूर्वी गाडी सुरू करून प्रवाशांची सोय केली आहे पण सांगोला थांबा दिलेला नाही.

सांगोला स्टेशनवर तात्काळ थांबा मंजूर करावा या मागणीचा विचार न केल्यास येथील नागरिकांसमवेत शहीद अशोक कामटे संघटनेच्या वतीने रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत. तरी या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. असे निवेदन मध्य रेल्वे विभाग सोलापूर यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नीलकंठ शिंदे सर, सदस्य व पदाधिकारी यांच्या वतीने देण्यात आले. या निवेदनाच्या प्रती खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी, जनरल मॅनेजर, मध्य रेल्वे, मुंबई. यांनाही देण्यात आल्याची माहिती शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने देण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post