आयकाॅन महिला उद्योजक क्लबची स्थापना




 ठाणे(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)-आयकाॅन फाऊंडेशन इंडिया या सामाजिक संस्थेने महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत महिलांचे सबलीकरण,स्वावलंबीकरण यासाठी समाजातील निराधार महिला व विधवा महिला यांच्यासाठी स्किल डेव्हलपमेंट व उद्योग रोजगार देऊन त्यांना आर्थिक,शैक्षणिक,आरोग्य व सामाजिक प्रगतीसाठी नुकताच आयकाॅन महिला उद्योजक क्लबची स्थापना करण्यात आली आहे.यावेळी नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यानुसार अध्यक्षा-भागश्री पानसरे,उपाध्यक्षा-छाया गचके,खजिनदार-प्रणाली भोसले,सचिव-सीमा विसपुते,कार्याध्यक्षा-निलाक्षी भोईर,सोशल मिडीया प्रमुख-सुचिता आरंके,मार्केटींग प्रमुख-पुर्वा दर्शने,व्यक्तिमत्व मार्गदर्शक-युक्ता मोरे,पर्यवेक्षक-स्वाती गुहे अशा या कार्यकारिणीची आयकाॅन फाऊंडेशन इंडिया या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलास काळे यांनी ठाणे येथे घोषणा केली.आयकाॅन महिला उद्योजक क्लबतर्फे सर्व महिलांना स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग व उद्योजकांसाठी लागणा-या शासकीय योजनांची माहिती देऊन निधी व्यवस्था मार्केटींग सेल्स स्टाॅल्स त्यांच्याकडून व्यवसाय यशस्वी करण्यासाठी लागणा-या सर्व गोष्टी"आयकाॅन फाऊंडेशन"पुरवठा करणार आहे.शेवटी आयकाॅन फाऊंडेशन इंडिया या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलास काळे यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिका-यांचे अभिनंदन केले व पुढील कार्य यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.



Post a Comment

Previous Post Next Post