कारला येथे बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे बॅनर जाळले

 समाजकंटकांवर तत्काळ कारवाई करा 




वंचित बहुजन आघाडी तर्फे एसडीपीओंना निवेदन 


युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांचे नेतृत्व


चांदूर रेल्वे - चांदूर रेल्वे तालुक्यातील कारला येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे लागलेले बॅनर अज्ञात समाजकंटकांनी जाळले असून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्या नेतृत्वात उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जाधव यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.



नुकतीच क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती झाली असून कारला या गावात जयंतीनिमित्त बॅनर लावण्यात आले होते. मात्र सदर बॅनर अज्ञात लोकांनी जाळल्याची घटना घडली आहे. यासंबंधी गावकऱ्यांनी कुऱ्हा येथील पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा दिली आहे. परंतु समाजकंटकाविरोधात कारवाई न झाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीतर्फे युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्या नेतृत्वात उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. व संबंधित व्यक्तीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई तत्काळ करावी अशी मागणी केली.



Post a Comment

Previous Post Next Post