बदलापूर (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
बदलापूरधील तळ्याची वाडी येथील आदिवासी पाड्यावरील नागरिकांना साई श्रद्धा विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला. संस्थेचे मार्गदर्शक गुरुनाथ तिरपणकर यांनी सुचवल्यानुसार डॉ. अमितकुमार गोईलकर संस्थापक असलेल्या डॉ निता पाटील फाऊंडेशनने दत्तक घेतलेल्या या आदिवासी पाड्यावरील नागरिकांच्या समस्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या. नगरपरिषद हद्दीत असूनही आजूबाजूला आधुनिक सोयी सुविधांनी युक्त शहरीकरण झालेले असताना सुद्धा हा आदिवासी पाडा इतका दुर्लक्षित आणि उपेक्षित असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यासारखी बाब आहे.
या आदिवासी बांधवांना जीवनावश्यक आवश्यक सामुग्री, जुने नवे कपडे, साड्या, रसोयीसाठी लागणारे जिन्नस, नवे चप्पल जोड रोगप्रतिकारक शक्तिवर्धक सप्लिमेंट्स इत्यादी सामानाचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलास सणस, सचिव युवराज शेलार, खजिनदार मिलिंद काटे, कार्याध्यक्ष प्रवीण साळवी आणि सदस्य रणजीत खडपकर, नितीन कदम, संतोष गावडे, संदीप सतनक, शैलेश धुमे, महिला सदस्य कविता भंडारी, तृप्ती चव्हाण, ममता आणि इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच निता पाटील फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. निता पाटील व डॉ. अमितकुमार गोईलकर आवर्जून उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला कुळगाव बदलापूर पालिकेच्या आशा सेविका संजीवनी पाटील आणि त्यांचे सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.