प्रमुख स्वामी शताब्दी महोत्सव अक्षयधाम अहमदाबाद येथे जगतगुरु स्वामी श्री रामराजेश्वराचार्यजी यांची पावन उपस्थिती

 


 भारतीय संस्कृती आणि सभ्यता वाढवण्याची क्षमता फक्त तरुणांमध्येच 



# 14 डिसेंबर लाआदरणिय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले प्रमुख स्वामी नगर व शताब्दी महोत्सवाचे उद्घाटन #



शशांक चौधरी 

प्रतिनिधी -

15 डिसेंबर 22 ते 15 जानेवारी 23 पर्यंत होणाऱ्या या महोत्सवात देशविदेशातुन 55ते 60 लक्ष भावीक भक्त उपस्थित होतील अशी अपेक्षा आहे.

अशा भव्य महोत्सवातअनंत श्री विभूषित जगतगुरु रामानंदाचार्य स्वामी श्री रामराजेश्वराचार्यजी समर्थ माऊली सरकार अहमदाबाद येथील अक्षरधाम श्री स्वामीनारायण मंदिर येथे आयोजित प्रमुख स्वामीजींच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

आपल्या विचारगंगेला प्रवाहीत करतांना 

आजच्या आधुनिक विज्ञानयुगात सनातन वैदिक हिंदू धर्मातील भारतीय सभ्यता आणि संस्कृतीला अखिल विश्वात हिमालयाच्या उंचीवर नेण्याचे सामर्थ्य तरुणांमध्येच आहे व भारतीय तरुणाई सनातन वैदिक हिंदुधर्माचे संस्कृती व सभ्यतेची भागीरथी निश्चितच प्रवाहित करेल हे ओळखून तरुण साधकामध्ये भक्तीचा प्रादुर्भाव प्रगट करण्याचे अलौकीक कार्य स्वामी नारायण संप्रदायाचे प्रमुख स्वामी यांनी केल्याचे दिसून येते. 

युवा शक्ती कलीयुगे।

संतशक्ती कलीयुगे। 

या तत्वाला अनुसरून युवकांना प्रेरित करण्याचे व त्यांच्यामधे भक्तीची भावना निर्माण करण्याचे महत्वाचे कार्य करीत ब्रह्मसूत्रात म्हटल्याप्रमाणे 'ज्योतिर्मय ब्रह्म' या सूत्रानुसार संत निरंतर सत्य, सत्व आणी तत्वाची अवधारणा करित असतात. भारतिय संस्कृती व सभ्यतेचे संवर्धन करण्याचे कार्य स्वामीनारायण संप्रदाय संपुर्ण निष्ठेने करित आहे,अशा शब्दात या कार्याचे कौतुक केले.

रामस्य स्वये ईश्वरः।

रामस्य स्वये नारायणः।

 या गुढ तत्वाचे रहस्य प्रगट करतांना हे तत्व जाणुन भगवंताची भक्ती प्रत्येकाचे मनात निर्माण व्हावी याकरिता साधुसंतांनी निरंतर कार्य करणे आवश्यक आहे.

आजच्या युगात समाजाने मुंगीची एकता टिकवून ठेवण्याची गरज आहे, कुटुंब आणि समाजाने एकत्र येऊन काम केले तर यश निश्चित प्राप्त होणारआहे.प्रमुख स्वामीजींनी युवाशक्तीला समजून घेऊन युवा साधकांना जोडून भारतीय सभ्यता आणि संस्कृती ची भगीरथी अखिल विश्वात प्रवाहित केली आहे.उत्सवात उपस्थित असलेल्या सर्व साधु संतांनी या कार्याचा अंगीकार करून सामाजिक समरसता महाकुंभात सहभागी होऊन विविध राज्ये व देशात सनातन हिंदु भारतिय संस्कृती व सभ्यतेच्या विस्ताराकरिता कार्य करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाला

अखिल भारतीय संत समितीचे अध्यक्ष श्री संत अविचलदासजी, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंडलेश्वर श्री धर्मदासजी, महामंडलेश्वर श्री गौरीशंकरदासजी, महामंडलेश्वर, मंडलेश्वर, अन्य आखाड्यांचे महंत व साधुसंतांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post