शिक्षणाधिकारी (प्राथ.) प्रिया देशमुख यांची जिल्हा परिषद माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाला सदिच्छा भेट

 



अमरावती जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर


आमरावती/ तळेगाव दशासर : येथील जिल्हा परिषद माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षण अधिकारी ( प्राथ.) प्रिया देशमुख, संगीता सोनोने वि. अ. (शि.), शरद चहाकार वरिष्ठ सहाय्यक जि. प. अमरावती यांनी जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला सदिच्च्छा भेट दिली असता . त्यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार व स्वागत करण्यात आले. त्यांनी शालेय भौतिक सुविधा व शैक्षणिक अध्यापन कार्य ,शालेय शिस्त व शालेय परिसर स्वच्छता याबाबत समाधान व्यक्त करून कौतुक केले.




 यावेळी भेटी दरम्यान निवड व सुचनेनुसार नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम करिता नवागत सुसज्य संगणक कक्ष याबाबत नियोजित जागेची पाहणी करून निश्चितिबाबत शास्वती दिली. यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र हाडे, चाफले सर, भगत सर, शाह सर, कदम सर, भेंडे सर, राठोड सर, नासिर सर, व सर्व शिक्षिका उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post