प्रा. कु. अंजली जाधव यांना राज्यस्तरीय प्रतिभा गौरव पुरस्कार जाहीर

 



  अभिनेत्री आर्या घारे यांच्या हस्ते होणार सन्मान

      सांगोला:- सांगोला तालुक्यातील चिंचोली गावची कन्या व माणदेश विद्यालय जूनोनी येथील प्राध्यापिका कु. अंजली जाधव यांना महाराष्ट्र राज्यातील टॅलेंट कट्टा महाराष्ट्र राज्य या संस्थेतर्फे दिला जाणारा मानाचा SUPER 30 राज्यस्तरीय प्रतिभा गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. अशी माहिती टॅलेंट कट्टा महाराष्ट्र राज्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व समन्वयक समिती यांनी दिली आहे . संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून या संस्थेतर्फे पुरस्कारासाठी फक्त 30 लोकांची निवड केली जाते . या मध्ये चिंचोली गावची कन्या अंजली जाधव यांची निवड करून त्यांना राज्यस्तरीय प्रतिभा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ही फार अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्रातून फक्त 30 लोकांना हा पुरस्कार दिला जातो त्यामुळे त्याला SUPER 30 राज्यस्तरीय प्रतिभा गौरव पुरस्कार असे म्हटले जाते . त्यांचे शिक्षण B.A.B.ed , M.A. B.ed , SET झाले असून त्या सध्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये तृतीयपंथी या विषयावर त्या P.H.D करत आहेत. तसेच त्यांचे काव्यांजली हे पुस्तक प्रकाशित झाले आहे . साहित्य लेखनाच्या माध्यमातून त्या जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असतात .

                         टॅलेंट कट्टा महाराष्ट्र राज्य या संस्थेतर्फे महाराष्ट्रातील कला ,क्रीडा, कृषी, शिक्षण, पर्यावरण अशा विविध क्षेत्रांमध्ये असामान्य टॅलेंट असणाऱ्या, आपल्या टॅलेंट च्या माध्यमातून समाजाला दिशा देणाऱ्या ३० व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यात येतो . सन्मानचिन्ह , सन्मानपत्र , शाल , श्रीफळ , मेडल व फेटा असे या पुरस्काराचे स्वरूप असून या पुरस्काराचे वितरण बारामती या ठिकाणी होणार आहे . विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो . कु. अंजली जाधव यांचा शैक्षणिक , सामाजिक , लेखन अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांचा अग्रणी सहभाग आहे . सामान्य माणसाप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि विविध क्षेत्रात असलेले योगदान लक्षात घेऊन टॅलेंट कट्टा महाराष्ट्र राज्य या संस्थेने आपला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे. 

               सदर कार्यक्रम रविवार दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी बारामती या ठिकाणी हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे . अभिनेत्री आर्या घारे , श्री. मेघराजे भोसले - (अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष , उपाध्यक्ष फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया , अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे ), श्री. भरत शिंदे ( चांडाळ चौकडीच्या करामती फेम बाळासाहेब ) व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते कु. अंजली जाधव यांना SUPER 30 राज्यस्तरीय प्रतिभा गौरव हा पुरस्कार देण्यात येणार आहे . अशी माहिती टॅलेंट कट्टा महाराष्ट्र राज्य या संस्थेतर्फे देण्यात आली आहे .

Post a Comment

Previous Post Next Post