स्त्री शक्ती मंच अकोला उपाध्यक्ष पदी विमलताई खानझोडे

गाव सहेली,सुविद्या बांबोडे 


  विमलताई खानझोडे यांनी अनेक सामाजिक कार्य केले आहे.कर्तव्य दक्ष कार्यकर्त्या असुन त्यांनी एकोनचाळीस वर्ष आरोग्य विभागा मध्ये कार्यरत होत्या.

या पुर्ण सेवेत एकही दिवस सुट्टी घेतली नाही हे उल्लेखनीय आहे. 

   सामाजिक कार्याची आवड असुन स्त्री शक्ती मंच संघटनेचे कार्य, काम करण्याची इच्छा आहे.

   म्हटलं म्हणुन त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना स्त्री शक्ती मंच संघटनेच्या मुख्य कार्यकारी अध्यक्षा शारदा भुयार यांच्या हस्ते विमलताई खानझोडे यांची अकोला जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.   

   विमलताई खानझोडे यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी, अनेक सामाजिक विषयांवर मार्गदर्शन समुपदेशन केले.

 सेवानिवृत्ती नंतर वरीष्ठ अधिकारी यांच्या विनंतीवरून त्यांनी प्लस पोलिओ

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कॅम्पचे आयोजन केले.

सतत छोटे/ छोटे कार्यक्रम महिलांचे घेऊन आरोग्य विषयक, पर्यावरण माहिती देवुन सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू असतात.

    राष्ट्रीय पर्यावरणामध्येही त्या म्हटल्याबरोबर सामील झाल्या म्हणूनच त्यांची अकोला जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

   अकोला जिल्हा मध्ये पर्यावरण असो किंवा इतर महिलांच्या कार्यक्रमास व त्यांच्याशी संपर्क साधावा.





Post a Comment

Previous Post Next Post