उमेदवाराचे काम का केले नाही दोघांना मारहाण एकाचे डोके फोडले

 



        औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख


 औरंगाबाद :  सोयगाव तालुक्यातील वरखेडीखुर्द येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून आमच्या उमेदवाराचे काम का करीत नाही असे म्हणत चौघांनी दोघांना मारहाण करून एकाचे डोके फोडले ही घटना रविवारी ( दि. १८ ) दुपारी साडेचार वाजाच्या सुमारास वरखेडीखुर्द ( ता. सोयगाव ) येथे घडली रविवारी रात्री मारहाण करणाऱ्या चौघाविरुद्ध फर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याप्रकरणी राजू शंकरसिंग राजपूत भरत ओंकारसिंग राजपूत गोविंद ओंकारसिंग राजपूत व संजय गुलाब परदेशी ( सर्व रा. वरखेडीखुर्द ता. सोयगाव ) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे राहुल किसन ताटू ( वय २९ रा. वरखेडीखुर्द ता. सोयगाव ) यांनी फर्दापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की रविवारी ( दि. १८ ) वरखेडीखुर्द ठाणा ग्रुप ग्रामपंचायत साठी मतदान सुरू असल्याने दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ते मतदान करून घरी जात होते त्याच सुमारास वरखेडीखुर्द बसस्टँड जवळ त्यांना त्याचा भाऊ रवींद्र किसन ताटू यांच्यासोबत गावातीलच भरत ओंकारसिंग राजपूत हा आमच्या ओळखीच्या उमेदवाराचे काम का करत नाही असे म्हणून जोरजोरात भांडण करीत असल्याचे दिसून आले हा वाद सोडविण्यासाठी राहुल ताटु तिथे गेले असता तिथे उपस्थित असलेल्या गोविंद ओंकार सिंग राजपूत व संजय गुलाब परदेशी या दोघांनी राहुल ताटू याचे दोन्ही हात धरले राजू शंकरसिंग राजपूत याने राहुल ताटू याच्या डोक्यात दगड मारला भरत ओंकारसिंग राजपूत यांनी मारहाण केली.   या चौघांनी राहुल किसन ताटू व रवींद्र किसन ताटू या दोघांना मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली याप्रकरणी राहुल किसन ताटू याच्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या वरील चौघा विरुद्ध फर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

   मारहाण करणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास फर्दापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनावरून पो. निलेश लोखंडे मिरखा तडवी हे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post