हिंगणघाट येथे स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी

 


Gavakadachi batmi 


वर्धा : दि. १२ डिसेंबर २०२२ ला स्थानिक गजानन महाराज मंदिर, तुकडोजी वार्ड, हिंगणघाट च्या प्रांगणात वर्धा जिल्हा वंजारी सेवा संघ तर्फे लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे यांची जयंती दिगांबरराव खांडरे यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली.

कार्यक्रमास युवा साहित्यिक प्रा. अभिजीत डाखोरे, अंकुर साहित्य संघाच्या वर्धा जिल्हाध्यक्षा डॉ. मनिषा ताई रीठे,युवा अभिनेत्री कु. मयुरी नव्हाते, वंजारी सेवा संघाचे पुर्व विदर्भ उपाध्यक्ष शिवाजीराव आखाडे, तुकारामजी मुंडे व जिल्हाध्यक्ष महेन्द्र घुले यांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते उदयोन्मुख अभिनेत्री मयुरी नव्हाते यांना शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात करण्यात आले. 

स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचा आलेख उंचावत असतानाच त्यांचा दुर्दैवी अंत झाल्याने फक्त वंजारी समाजाचीच नव्हे तर संपूर्ण देशाची हानी झाली, असे मत प्रा. अभिजीत डाखोरे व डॉ. मनिषा रीठे यांनी व्यक्त केले. तसेच सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन भव्य समाज भवन निर्माण करावे असे मत पोलीस उपनिरीक्षक मुंडे यांनी व्यक्त केले व त्याला मदत करण्याचे आश्वासन कार्यक्रमाचे अध्यक्ष दिगांबरराव खांडरे यांनी दिले.

  वंजारी समाजाने एकजुटीने राहणे आजच्या परिस्थितीत आवश्यक असून संघटीत राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन संघाचे विदर्भ उपाध्यक्ष शिवाजीराव आखाडे यांनी या कार्यक्रमादरम्यान केले.


कार्यक्रमाचे संचालन वंजारी सेवा संघाचे कोषाध्यक्ष गजानन साळवे यांनी केले तर आभारप्रदर्शन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. सुस्मिताताई आखाडे यांनी केले.

कार्यक्रमात गटातटाचे विभाजन न करता सर्वांनी मिळून समाजासाठी एकत्रित कार्य करूया असे आवाहन वर्धा जिल्हाध्यक्ष महेंद्र घुले यांनी केले. 

कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता गजानन मंदिराच्या रवी रोहणकर सचिन नव्हाते, सौ. रविला आखाडे, प्रमोद मुंडे, शिवकुमार घुले, खांडरे सर व कार्याध्यक्ष अशोकराव साठे यांनी सहकार्य केले

कार्यक्रमास अनेक समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post