विदर्भ राज्य आंदोलन समितीचे चांदुर रेल्वे तालुक्याची बैठक संत गाडगेबाबा मार्केटमध्ये घेण्यात आली .या बैठकीत 19 डिसेंबर नागपूर विधान भवनावर होणाऱ्या हल्लाबोल आंदोलनात चांदुर रेल्वे तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
या बैठकीची सुरुवात शेतकरी संघटनेच्या कापूस आंदोलनात शहीद प्रकाश काळे यांच्या 25 व्या स्मृतिदिनी त्यांना ऍड . मनोहर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या बैठकीत 19 डिसेंबर 2022 रोजी होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपूर विधान भवनावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे . त्याकरिता यशवंत स्टेडियम नागपूर सकाळी 11 वाजेपर्यंत या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने तालुक्यातून विदर्भप्रेमी नागरिकांना सहभागी होण्याचे आव्हान या बैठकीतून करण्यात आले . तसेच जनजागृतीच्या दृष्टिकोनातून गावोगावी बैठका घेण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. सदर हल्लाबोल आंदोलनाद्वारे 1,केंद्र सरकारने विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करावे 2, विजेची दरवाढ राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावी व शेती पंपाला दिवसाचे लोड शेडिंग बंद करावे3, वैधानिक विकास मंडळ नको, विदर्भ राज्यच हवे,4, अन्नधान्यावरील जीएसटी तात्काळ रद्द करावी.4, बल्लारपूर सुरजागड रेल्वे मार्गाचा केंद्र सरकारने टाका मंजुरी प्रदान करून निघालो उपलब्ध करून निधी उपलब्ध करून द्यावा.5, विदर्भातील 11ही जिल्हे ओला दुष्काळ जाहीर करावे .या मागण्या आंदोलनाद्वारे करण्यात येणार आहे.या बैठकीत जिल्हा अध्यक्ष राजेंद्र आगरकर, तालुका अध्यक्ष अशोकराव हांडे, शहराध्यक्ष बाबारावजी जाधव, शेतकरी संघटनेचे नेते दिनकरराव निस्ताने ,सुधाकर थेटे, नंदूभाऊ देशमुख यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत दुर्योधन जाधव ,,दीपक शंभरकर ,यादवराव कांबळे ,सुनील कचवे ,रवींद्र बडगुले, साई जाधव ,अरुण पाटील, दुर्योधन जाधव , दिजिवे जाधव आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.