तालुका प्रतिनिधी शशांक चौधरी
तिवसा - दिवसेंदिवस रासायनिक व हानिकारक खते कीटकनाशकांचा अतिवापरामुळे शेताच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात होणारी घट व मानवाच्या जीवनाला होणाऱ्या नुस्कानापासून वाचवण्यासाठी नवभारत फर्टीलायझर चे अधिकारी विवेक जाधव(Ao) पवन नागे(Ao) , ज्ञानदेव जटाले(GL). यांनी सुकांडा.ता.मालेगाव.जिल्हा.वाशिम येथील शेतकऱ्यांना जैविक शेती व सेंद्रिय शेती बद्दल नवभारत फर्टीलायझर लिमिटेड कंपनी च्याअधिकाऱ्यांनी सेंद्रिय शेती व जैविक शेती बद्दल माहिती दिली. तसेच कंपनीद्वारे शेतकऱ्यांना देण्यात येणारे जैविक सेंद्रिय शेती बद्दल निशुल्क मार्गदर्शन तसेच इतर सेवांबद्दल शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले, तसेच येणाऱ्या काळामध्ये जैविक व सेंद्रिय शेती करणे आवश्यक असून आतापासून शेतकऱ्यांना जैविक शेती व सेंद्रिय शेतीकडे वळावे यासाठी लागणारे आवश्यक मार्गदर्शन कंपनीतर्फे निशुल्क पुरवले जाईल असा विश्वासही कंपनीचा अधिकारी यांनी दिला त्यावेळी उपस्थित शेतकरी यांना दिला तसेच या कार्यक्रमाला गावचे प्रगतशील शेतकरी विलासराव घुगे,संदीप इंगळे,सतिश घुगे व सर्व गावकरी मंडळी जण उपस्थित होते.