1 आठवड्यात 2 बालविवाह प्रकरणात पालकांकडून ह्म्मी पत्र घेतले लिहून
आर्थिक परिस्थिती हलक्याची व घरगुती कलह यातून मुलीचा बालविवाह करण्याचा निर्णय.
अमरावती, सदानंद खंडारे : चाईल्ड लाईन 1098 निशुल्क क्रमांक यावर माहिती मिळाली की, राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एरियामध्ये एका अल्पवयीन बालिकेला वडील शाब्दिक शिवीगाळ करून अश्लील भाषेत बोलतात , तसेच तुला पाहण्यासाठी पाहुणे आणतो व अल्पवयात लग्न करतो अशी वडील मुलीला धमकी देतात करिता चाईल्ड लाईनची मदत मागितली. चाइल्ड लाईन टीम ने मुलीच्या घरी जाऊन मुलीची व आईची भेट घेतली. तेव्हा मुलीने सांगितले कि, वडील दारू पिऊन नेहमी शिवीगाळ करून अश्लील भाषेत बोलतात, तसेच अल्पवयात लग्न करून देण्याच्या धमक्या देतात, व घरात नेहमी वादिवाद करतात अशी माहिती चाईल्ड लाईन टीम ला मुलीने भेटी दरम्यान दिली.
तेव्हा टीम ने मुलीच्या आईला विश्वासात घेऊन मुलीचे समुपदेशन करून सांत्वन केले. तसेच मुलीच्या वडिलांना संपर्क करून भेट घेतली व बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 याविषयी जनजागृती करून त्यानंतर वडिलांची समजूत काढली. व त्यानंतर मुलीला आई व वडिलांसह बाल कल्याण समिती अमरावती यांच्या समक्ष उपस्थित करून मुलीच्या समस्येबाबत चाईल्ड लाईन कडून पत्र दिले. त्यावर बाल कल्याण समिती अमरावती यांनी मुलीच्या वडिलांकडून मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण होई पर्यन्त लग्न करणार नाही तसेच मुलीला कुठलाही त्रास देणार नाही. असे बालविवाह थांबविण्यासाठीचे ह्म्मी पत्र लिहून घेतले.
तसेच मुलीला पुढील मदत व देखरेख चाईल्डलाईन टीम अमरावती करेल असे सांगण्यात आले. सदर प्रकरणात पाठपुरावा घेण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, सचिव माधुरी चेंडके, चाईल्ड लाईनचे संचालक डॉक्टर नितीन काळे, बालकल्याण समिती अमरावती च्या अध्यक्षा किरण मिश्रा, सदस्य अंजली गुलाक्षे, सुचिता बर्वे, सारिका तेलखडे, यांचे लाभले, पाठपुरावा घेण्यासाठी अतिपरिश्रम, चाइल्ड लाईनचे केंद्र समन्वयक शंकर वाघमारे, समुपदेशक सपना गजभिये, टिमेंबर मीरा राजगुरे, पंकज शिनगारे, सरिता राऊत, अजय देशमुख, ऋषभ मुंदे, सूर्योदय जेवले, अभिजीत ठाकरे यांनी केली. तसेच बालकांसाठी कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास चाईल्ड लाईनच्या 1098 या क्रमांकावर निशुल्क कॉल करण्यासाठी आव्हान केले.चाईल्ड लाईन संचालक डॉ. नितीन काळे व चाईल्ड लाईन केंद्र समन्वयक शंकर वाघमारे यांनी केले.