शहरात न्यूझीलंड विरुद्ध क्रिकेट सामन्यात सातूर्णा येथे सट्टा; बनावट आयडीवर गोरख धंदा

 


पुंडलिकराव देशमुख विशेष प्रतिनिधी

अमरावती : भारत व न्यूझीलंड संघातील क्रिकेट समस्येवर अमरावती येथे सातूर्णा येथे खेळवला जाणाऱ्या सट्यावर पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने सकाळी धाड टाकली.

 या कारवाईत एका सट्टेबाजाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून २० हजार१०० रुपये चार मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सचिन वासुदेव येरवणे (वय३७रा. सातुर्णा अमरावती )असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातुर्णा येथे सचिन हा स्वतःच्या घरून मोबाईलवर वेगवेगळ्या बोगस आयडी च्या साह्याने भारत व न्यूझीलंड संघ दरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर सट्टा तसेच जुगाराची काय वाडी व लागवाडी करीत असल्याची माहिती  विशेष पथकाला मिळाली.

 या माहितीच्या आधारावर सचिनच्या घरी धाड टाकली. या कारवाईत सचिनला ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन मोबाईल, चार्जर व अन्य साहित्य असे २० वीस हजार १०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 सचिन हा कास्को उर्फ अनिल मिटकर देशपांडे प्लॉट यांच्याकडून आयडी घेऊन सट्याची लागवडी करीत असल्याचे त्याने पोलीस चौकशी सांगितले जुगाराची लागवड ही सोनू उदापूर उर्फ उदापूरकर (रा.परतवाडा) याच्याकडे करीत असल्याची कबुली आरोपी सचिनने विशेष पत्काला दिली.

 सचिन याला मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी राजापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश इंगळे ,दीपक श्रीवास्तव ,राजीक रायवाले, लखन खुश राज यांनी चौकशी दरम्यान कारवाई करण्यात आली. तीन वर्षांपूर्वी अंजनगाव शहरात क्रिकेट सट्यावर धाड टाकण्यात आली होती. त्यावेळी देखील उदापूरकराचे नाव उघड झाले होते वरून शहरातील आयपीएल जुगाराचे तार देखील त्याच्याशी जुळले असल्याची माहिती समोर आली होती.

 त्यामुळे सोनू उद्या पुरे उर्फ उदापूरकर यास अटक केल्या आयपीएस सत्याचा उलगडा होऊ शकतो सीपीचे विषय पथक गुन्हेगारीला आळा घालण्याकरता सज्ज. सी पी . डॉ. आरती सिंह यांना अपेक्षित ट्रान्स पोलिसांच्या आदर्श वस्तू पाठ विशेष पथकाने घालून दिला. त्यामुळे शहर पोलीस दलात सध्या सीपी चे विशेष पथक जोरात असल्याचे सकारात्मक प्रतिक्रिया उमटली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post