भारतीय संविधान सन्मान समिती कोल्हापूर यांचे वतीने होणाऱ्या संविधान दिनानिमित्त बिंदू चौक ते राजश्री छत्रपती शाहू महाराज जन्म स्थळापर्यंत रॅलीस उपस्थित राहण्याचे आवाहन.
----------------------------------------
आयु. प्रेमानंद मौर्य,अध्यक्ष.
आयु. पी.एस. चोपडे,सचिव.
आयु.संदीप धनवडे,कोषाध्यक्ष,
भारतीय संविधान सन्मान समिती, कोल्हापूर. यांचे वतीने उपस्थित
राहण्याचे केले आव्हान.
कोल्हापूर दिनांक 26 नोव्हेंबर
एकनाथ राजाराम पाटील
विशेष प्रतिनिधी पॉलिटिकल ब्युरो.
शनिवार दि. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व सामाजिक परिवर्तनवादी संघटनांच्या सहभागाने कोल्हापुर येथील बिंदू चौक ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे समाधीस्थळ या ठिकाणापर्यंत भारतीय संविधान सन्मान मार्च आयोजित करण्यात आलेला आहे.
या अनुषंगाने सर्व संघटनांच्या सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ता यांच्याशी संपर्क साधून,संविधान मार्चमध्ये आपापल्या संघटनांच्या बॅनरसह मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे नम्र आवाहन तथा विनंती करण्यात आलेली आहे.
त्यानुसार भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ छत्रपती शिवाजी,फुले,शाहू, आंबेडकरी विचारांच्या सामाजिक संघटना यांच्यासह संघटित व असंघटित क्षेत्रातील कार्यरत विविध मागासवर्गीय व अल्पसंख्यांक तथा पुरोगामी व सामाजिक परिवर्तनवादी संघटना या मार्चमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
कोल्हापुर हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सत्यशोधक विचारांचे व सामाजिक परिवर्तनाचे ऐतिहासिक ठिकाण म्हणून सर्वश्रुत आहे. परिवर्तनाचा व सामाजिक एकतेचा तथा बंधुत्वाचा विचार याच नगरीमधून सातत्याने पुढे आलेला आहे. कोल्हापूरवासियाना याचा सार्थ अभिमान आहे.
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर
हे केवळ संविधान निर्मातेच नसून, राष्ट्रनिर्माते व आधुनिक भारताचे शिल्पकारही आहेत म्हणून जगामध्ये त्यांचा नावलौकिक आहे. जागतिक पातळीवर सर्वच विद्वानांनी भारताकडून जर काही घ्यायचे असेल तर तथागत गौतम बुद्ध व भारताचे संविधान या दोन प्रमुख आदर्शांचा सातत्याने उल्लेख केलेला आहे. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळामध्ये असताना जे आधुनिक भारताचे स्वप्न पाहिले होते,
जे प्रभावशाली नियोजन केले होते त्यामध्ये प्रामुख्याने नदी जोड प्रकल्प,ऊर्जा धोरण,संघटित व असंघटित कामगारांच्या साठी केलेले कायदे, स्त्रियांच्या हक्कासाठी व उन्नतीसाठी तथा संरक्षणासाठी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तयार केलेले हिंदू कोड बिल यासह आधुनिक भारताच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या ज्या संकल्पना बाबासाहेबांनी योजिल्या त्या सर्व संकल्पना आज सत्यात उतरताना दिसत आहेत परंतु त्याचे श्रेय बाबासाहेबांना दिले जात नाही.
हे चिंताजनक आहे.
फुले,शाहू, आंबेडकर या महामानवांच्या संघर्षामुळे जी सामाजिक क्रांती झाली त्या क्रांतीच्या विरोधामध्ये प्रस्थापितांच्या माध्यमातून प्रतिक्रांती घडविण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि विद्यमान केंद्र सरकार हे त्यादृष्टीने मोठ्या प्रमाणात आपले मूलभूत अधिकार व हक्काचे हनन करीत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,संविधान कितीही चांगले असले तरी ते राबवणारे लोक जर चांगले नसतील तर संविधान कधीही यशस्वी होणार नाही. उलट संविधान कितीही वाईट असले व ते राबवणारे लोक जर चांगले असतील तर ते संविधान यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.* या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संदेशाची आपणासर्वांना नेहमी आठवण असली पाहिजे. आणि याच विचारावर ठाम असलेल्या कोल्हापुरातील सर्व संघटना संविधानाच्या संरक्षणासाठी तन-मन-धनाने संघर्ष करण्यासाठी एकवटलेल्या आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकट्याच्या अथक प्रयत्नाने जे आपल्याला संविधानिक अधिकार मिळालेले आहेत ते सर्व अधिकार आज आपल्या समाजामध्ये अनेक विद्वान, विचारवंत, संशोधक, कायदेतज्ञ, तत्त्वचिंतक, उद्योगपती, असताना आपले संविधानिक अधिकार आपल्या सर्वांच्या डोळ्यादेखत काढून घेण्यात येत आहेत किंबहुना पद्धतशीरपणे नष्ट करण्यात येत आहेत व आपण सर्वजण मूग गळून गप्प आहोत हा कशाचा परिणाम आहे.आपल्या भावी पिढीच्या समोर
खूप मोठे आव्हान प्रस्थापित मनुवाद्यांनी व धन दांडग्यांनी उभे केलेले आहे. याचा आपण सर्वांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे.
संविधान आहे तर आपण आहोत तेव्हा घटनात्मक अधिकाराच्या संरक्षणासाठी आपण सर्वांनी शनिवार दि.२६ नोव्हेंबर २०२२ रोजी बिंदू चौकामध्ये सकाळी १०.०० वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहून संविधान सन्मान मार्च यशस्वी करावा असे आवाहन
आयु. प्रेमानंद मौर्य,अध्यक्ष.
आयु. पी.एस. चोपडे,सचिव.
आयु.संदीप धनवडे,कोषाध्यक्ष,
भारतीय संविधान सन्मान समिती, कोल्हापूर.
यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.