पुंडलिकराव देशमुख विशेष प्रतिनिधी
अमरावती : जिल्ह्यातील दर्यापूर येथील शासकीय क्रीडा संकुलात धनुर्विद्याचे सराव करीत असताना बाजूला खेळत असलेल्या १५ वर्षीय बालकाच्या चेहऱ्या त बाण घुसल्याने तो रक्त बांबळ झाला. दुपारी चार वाजता शासकीय क्रीडा संकुल येथे ही घटना घडली सध्या मुलाची प्रकृती स्थिर आहे. प्राप्त माहितीनुसार, सराव करीत असलेल्या विद्यार्थ्याकडून बान सुटला होता. बाण बाजूला खेळत असलेल्या मुलाला लागला वेदांत गणेश बहाडे वय१५ असे त्या जखमी मुलाचे नाव आहे.
तो आदर्श विद्यालयाचा विद्यार्थी आहे तो विद्यार्थी आदर्श शाळेत सातव्या वर्गात शिकत आहे. त्याला तातडीने खाजगी रुग्ण दाखल करण्यात आले होते सदर त्या जखमी मुलाच्या चेहऱ्यावरील बाण डॉक्टरांना बाण काढण्यात आले दरम्यान कुठल्याही प्रशिक्षण वेळी सुरक्षितेसाठी प्रशिक्षक सोबत असणे अतिशय गरजेचे मात्र त्यावेळी शासकीय क्रीडा संकुलनावेळी प्रशिक्षण देताना घटनास्थळी शिक्षक उपस्थित नसल्याचे काही प्रत्यक्ष दर्शनी सांगितले.
सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना वारंवार सोडून प्रशिक्षक गायब झालेत कसे असाही सवाल या निमित्त विचारला जात आहे याप्रकरणी कुठलीही तक्रार अद्याप कुठेही दाखल झालेली नाही.