विश्वात भारताची गाथा महान आहे
सर्वोपरी अम्हाला हेे संविधान आहे
स्वातंत्र्य न्याय समता सा-याच बांधवांना
मुल्यांस वाहिलेले प्रत्येक पान आहे
आहे गरीब, कोणी किंवा बडी असामी
न्यायालयात तोही ह्याच्या समान आहे
अधिकार मानवाचे लाभोत माणसाला
सुत्रात बांधलेले मानव्य गान आहे
कर्तव्यपालनाचे आदेश दे अम्हाला
राष्ट्रीय एकतेचा ह्याच्यात प्राण आहे
विश्वास धर्म श्रद्धा आपापल्या असाव्या
सारे समान येथे सर्वांस मान आहे
आहेत ग्रंथ लाखो दुनियेत गाजलेले
हे संविधान अमुचे आम्हा प्रमाण आहे.
प्रदीप बा. देशमुख
चंद्रपूर
भ्र.ध्व. 9421814627