कृषिमंत्री सत्तार यांनी हॉटेलवर बसून घेतली चहाची चुस्की



औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख

     औरंगाबाद. फर्दापूर ( राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे नेहमी सामान्य माणसात मिळून मिसळून राहतात. मंत्री अब्दुल सत्तार यांचा साधेपणा पुन्हा समोर आला आहे. सोयगाव तालुक्यात विविध विकास कामांच्या उदघाटन प्रसंगी आलेल्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यक्रमानंतर सोबत असलेले अधिकारी, सुरक्षा कर्मी, पदाधिकारी व गावकऱ्यांसोबत फर्दापूर येथील चहाच्या टपरीवरील बाकावर बसून चहा घेतला. मंत्री पदाचा कोणताही अभिमान न बाळगता मंत्री अब्दुल सत्तार यांनी चहावाला शेख आवेस याला आपल्या बाजूने बसवून त्याची आपुलकीने विचारपूस केली. अनेकांनी हा प्रसंग आपल्या कॅमेरात टिपला. त्यानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांची " चाय पे चर्चा " चांगलीच रंगली.

    मंत्री अब्दुल सत्तार यांचा हा पहिला प्रसंग नसून ते दौऱ्यात असतांना सर्व सामान्य माणसाला मोठ्या आस्थेने विचारपूस करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतात. आपला ताफा थांबवून कधी शेतकरी - शेतमजूर, विद्यार्थ्यांशी संवाद तर कधी गावातील जेष्ठ नागरिकांच्या हाताने विकास कामांचे उद्घाटन करणे आशा एक ना अनेक प्रसंगातून मंत्री अब्दुल सत्तार यांचा साधेपणा पहायला मिळातो. फर्दापूर येथे बाकावर बसून चहा घेत असताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी गावकऱ्यांसोबत मिसळून गमतीजमती करत मनसोक्तपणे संवाद साधला. मंत्री अब्दुल सत्तार यांचा हा साधेपणा पाहुन उपस्थित सर्वचजण चक्क राहून गेले.

यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रभाकर काळे, माजी जि.प.सदस्य गोपीचंद जाधव, उस्मान खा पठाण यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, पदाधिकारी व गावकऱ्यांची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post