तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न
सुनिल कोसे/ चिमूर
चंद्रपूर/ चिमूर: शासनाने खरीप आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत चिमूर तालुक्यात एकूण 8 आदिवासी विवीध कार्यकारी सहकारी संस्था व 2 खरेदी खरेदी विक्री ची केंद्रे मंजूर करण्यात आलेली असून त्या संबंधाने दि. 24/11/2022 ला तहसील कार्यालय चिमूर येथे आढावा सभा पार पडळी.
यावेळी तहसीलदार व नायब तहसीलदार यांनि तालुक्यातील सर्व आधारभूत खरेदी केंद्राला शासन निर्णयाप्रमाणे खरेदी करण्याचा सूचना देण्यात आल्या त्याच सोबत शासनाने दिलेल्या पद्धतीनेच खरेदी करण्यात यावी असे आदेश देण्यात आले.
त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी 30/11/2022पर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्वतः खरेदी केंद्रांवर जाउन नोंदणी करण्याचे आव्हाहन खरेदी केंद्र प्रमुखांनी केलेले आहे.
या आढावा सभेला मार्गदर्शक म्हणून तहसीलदार प्राजक्ता बुरांडे, पुरवठा निरीक्षक आशिष फुलुके, आदिवासी संस्थांचे आधारभूत खरेदी केंद्राचे प्रमुख विनोद बारसागडे, मंगेश मस्के, प्रशांत ठावरी, पंकज रणदिवे, एस बी सामूसाकडे, लक्ष्मण झोडे, आर पी दडमल, चौधरी, फेडरेशन चे प्रमुख रमेश बोलधने, मारकवर तथा आदिवासी महामंडळ चे प्रतिनिधी येरमे यादी उपस्थित होते.