आदित्य ठाकरे यांचे सह बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती.
मुंबई विशेष प्रतिनिधी / तानाजी कांबळे
बुधवार दिनांक 30 नोव्हेंबर 2022
नागपूर येथे दि. 19 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची महत्वपूर्ण बैठक आज, बुधवार, दि. ३० नोव्हेंबर २०२२ रोजी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विधानभवनातील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते
अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, आदित्य ठाकरे, दिलीप वळसे पाटील, एकनाथराव खडसे, हसन मुश्रीफ, अनिल परब, सुनील प्रभू, अजय चौधरी, शशिकांत शिंदे, भाई जगताप, सचिन अहिर, सुरेश वरपुडकर, अमिन पटेल,अनिल पाटील, बाळाराम पाटील, अबू आझमी, कपिल पाटील, रईस शेख आदी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य उपस्थित होते.