सुरक्षा रक्षक विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण मागे


गावाकडची बातमी,शाम जाधव 


 मुंबई : आझाद मैदान येथे न्याय संघटनेच्या वतीने न्याय संघटना अध्यक्षा : आश्विनी अनिल सोनावणे यांनी आमरण उपोषण केले . 

  त्या वेळेस महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री सुरेशजी खाडे साहेब . यांनी न्याय संघटनेचे शिस्ट मंडळ बोलावले होते . त्या वेळेस पागारवाढी संदर्भात सकारात्मक चर्चा झालीअसुन येत्या दहा दिवसांत मंत्रालय येथे मिटींग लावुन पगारवाढीची मान्यता ( घोषणा ) करणार आहेत . 

सकारात्मक चर्चा झाल्यामुळे न्याय संघटनेच्या ध्यक्षा आश्विनीताई सोनावणे यांनी महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री यांच्या विनंतीला मान देऊन कामगार मंत्री सुरेशजी खाडे साहेब यांच्या हस्ते तसेच महाराष्ट्र कामगार सहा कामगार आयुक्त बुवा साहेब यांच्या हस्ते आमरण उपोषण तात्पुरत्या स्वरुपात मागे घेण्यात आले .सुरक्षा रक्षक न्याय संघटनेच्या मध्यमातुन सर्व महाराष्ट्रातिल सुरक्षा रक्षकांचा विजय झाला आहे . आणि आजच्या उपोषणाला ज्या माझ्या मित्र पक्ष संघटना तसेच सुरक्षा रक्षक बांधवांनी हजेरी लावली खऱ्या अर्थाने या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले . व सुरक्षा रक्षकांचा विजय झाला .

 न्याय संघटना सर्वांचे आभार मानत आहे . 

   तसेच विशेष सहकार्य व खारीचा वाटा आमचे मित्र संजय गायकवाड, संजय पाटील यांचेही आभार . तरी उपोषण स्तगीत केल्यामुळे उद्या कोणीही आझाद मैदान येथे जाऊ नये.

  त्या वेळेस न्याय संघटना महा.उपाध्यक्ष शंकर इंगोले, महा उपाध्यक्ष : संजय चामाटे . व महा सदस्य दिपक कदम . ठाणे जिल्हा अध्यक्ष :अभिमन्यु वाव्हळ,अनिल पवार, विलास कच्छवे तसेच महेंद्र म्हशे, जाधव, अनेक सुरक्षा रक्षक बांधव उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post