महान ग्रंथ आहे भारत देशाचे संविधान



महान ग्रंथ आहे भारत देशाचे संविधान

बा भिमान लिहिल सुवर्ण अक्षरान ॥ धृ ॥

थकले पटेल अन जवाहर लाल नेहरू

क्षणात भिमरायाने केले लिखाण सुरु

2 वर्ष11 महिने 22 दिवसात झाले पूर्ण

एकाच विद्वानान लिहिले ते संपूर्ण

स्वतंत्र भारताची भिमान उंचाविली मान

महान ग्रंथ आहे भारत देशाचे संविधान ..... ॥ 1 ॥

स्वातंत्र समता बंधूता न्याय दर्जाची समानता

केली वृदधिंगत देशाची एकात्मिकता अन् एकता

महत् प्रयासाने लिहिले रात्रंदिन जागता

अल्पावधीतच केली या महान ग्रंथाची सांगता

26 नोव्हें 1949 ला अर्पिले देशाला संविधान ॥2 ॥

26 जाने1950 रोजी संविधान अंमलात आले

साऱ्या अन्यायातून दिनदलितांना वाचविले

प्रत्येकास जगण्याचे अधिकार न्याय मिळाले

गावागावात जयभिम सारेच गर्जू लागले

विश्वात भिमाने भारताची चढविली कमान ॥ 3 ॥

कोहिनूर हा भारताचा भिमराव दिपस्तंभ झाला

त्याने तिमिरातूनी समाज तेजाकडे आणला

कधी ना पाहिले त्याने संसाराला ना पाहिले स्वतःला

घालविले आयुष्य त्याने सुधारण्या मानवाला

जगात ठरला घटनाकार भिमा पहिला विद्ववान

महान ग्रंथ आहे भारत देशाचे संविधान ॥4॥

सुनंदा गवई

भद्रावती जि चंद्रपूर

फोन नं 9518727692

Post a Comment

Previous Post Next Post