बुलढाणा / जिल्हा प्रतिनिधी
✍️ वसंत जगताप
धामणगाव बढे येथिल एम.ई.एस. विद्यालय माध्यमिक व उच्च माध्यमिक धामणगाव बढे येथे 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधान गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एम.पी शेले सर तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक ए.ए.चांदोरे सर ज्येष्ठ शिक्षक ठाकूर सर, राठोड सर, वानखडे सर हे होते. सर्वप्रथम डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान पुस्तकाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये एस.आर.चव्हाण सर यांनी भारतिय संविधान विश्वविख्यात व सर्वात श्रेष्ठ म्हणुन ओळख आहे असे मत व्यक्त केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगता मधून संविधाना बद्दल भरपुर माहिती दिली. विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री चांदोरे सर यांनी संविधान निर्मिती प्रक्रियेवर विस्तृत विचार मांडले. तर ज्येष्ठ शिक्षक वानखडे सर यांनी संविधानातिल ३९५ कलम या बाबत विस्तृत माहीती व मौलीक मार्गदर्शन व विविध कलमां सह विस्तृत माहिती दिली. अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक. एम.पी.शेले सर संविधानाने दिलेल्या अधिकाराची माहिती दिली व त्याचप्रमाणे नागरिकांच्या कर्तव्याची माहिती दिली आणि त्या कर्तव्याची जाण आपल्याला असली पाहिजे असे आपल्या अध्यक्षिय भाषणात प्राचार्य शेले सर यांनी सांगितले. संविधान दीनाचे कार्यक्रमाचे अंती 26 /11 च्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना उपस्थितांनी भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी. यांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.प्राची जगताप, कु.स्नेहा पवार यांनी केले.
आभार प्रदर्शन कु.निकिता चव्हाण या विद्यार्थिनींनी मानले.