तालुका प्रतिनिधी शशांक चौधरी - तिवसा
श्रीराम शिक्षण संस्था धामणगाव रेल्वे संचालित कला विज्ञान महाविद्यालय कुऱ्हा येथे २६ नोव्हेंबर हा दिन भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला .संविधान तयार करण्यासाठी अपार परिश्रम घेण्यारा सर्व महान विभूतींना सर्वातआधी वंदन करून, संविधानातील उद्देश पत्रिकाचे सामुहिक वाचन करण्यात आले.याप्रसंगी अध्यक्ष म्हणून डाॅ.विभा देशपांडे ह्या होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डाॅ.अजय अभ्यंकर , डॉ. निशा जोशी प्रा. हर्षा कांबे ह्या होत्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक,व सूत्रसंचालन कु.एश्वर्या आमले हिने केले त्यात मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर तिने प्रकाश टाकला.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डाॅ.अजय अभ्यंकर यांनी आपल्या उदबोघनातून सांगितले की ,भारतीय संविधान हे जगातील उच्चतम संविधान आहे.व सर्वसमावेशक, असून सर्व घटकांना त्यात स्थान आहे.अध्यक्षीय भाषणात डाॅ.विभा देशपांडे यांनी भारतीय संविधानाची निर्मिती कशी झाली व आपल्या घटनाकारांनी अनेक दिवसांपासून पाहिलेले स्वप्न या संविधानाच्या माध्यमातून त्यांना बोलके करता आले.संविधान म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग आहे. संविधानाचे आपण सर्वांनी अघ्ययन करायला पाहिजे.असे सांगितले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन
कु स्वाती देशपांडे हिने केले. यावेळी कु निकीता राऊत, समृद्धी लवणकर, हिने संविधानाचे महत्व भाषणातून तर प्रिया बावने हिने गायनातून विषद केले.
या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद , विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदना व वंदेमातरम् या गीता व्दारे झाली.