गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील नवरगांव येथे बौद्ध समाजानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामफलक लावल्यामुळे दोन गटात जातीय तणाव निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे त्या गावात पोलिस चौकी बसवावी व गावात कायदा व सुव्यवस्था शांतता निर्माण व्हावी.
अशी मागणी रिपब्लिकन पार्टी चे नेते मुनिश्वर बोरकर भारत मुक्ती मोर्चा चे जर्नाधन तांकसाडे प्रकाश बांबोळे यांनी तहसिलदार चामोर्शी यांचेकडे निवेदनातुन केली आहे . बौद्ध समाज नवरगांव गिलगांव येथील जागेवर गेल्या सहा वर्षापासुन पंचशिल झेंडा आहे. सदर झेंडा फडकविताना गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येवून कार्यक्रम घेतात.
सदर झेंड्या जवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाला नाव द्यावे अशी मागणी बौद्ध समाज बांधव नवरगांव यांनी ग्रामसभेच्या ठरावात मंजुर करून घेतले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे नामफलक लावले. त्यामुळे काही जातीयवादी लोकांच्या पोटात दुखले व यातूनच वादाची ठिणगी पेटली.
SDPO, तहसिलदार , पोटेगाव ठाणेदार सर्व बांधकाम विभागाचे अधिकारी त्या गावात हजर झाले.
गावकर्याना समजविण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु दोन्ही गट मानायला तयार नाही.
त्यामुळे सात दिवसाची मुदत तहसिलदार चामोर्शी यांनी दिली . बौद्ध बांधवांची कम सख्या बघता तात्पुर्ते पोलिस चौकी घ्यावी व शातता निर्माण करावी अशी मागणी रिपाइचे मुनिश्वर बोरकर सहीत बौद्ध बांधव नवरगाव यांनी केली आहे. तहसिलदार कोणती कारवाई करतात याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे..