विदर्भ/ नागपूर :- दिनांक २३ नोव्हेंबर रोजी शहीद झालेल्या ११४ आदिवासीं गोंड/गोवारी समाज बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
२३ नोव्हेंबर १९९४ रोजी आदिवासी गोंड गोवारी समाजा ने विधान भवनावर मोर्चा काढण्यात आला होता व त्या ठिकाणी चेंगरा चेंगरी झाली व त्या चेंगरा चेंग्रित ११४ आदिवासीं गोंड गोवारी समाज बांधव यांनी आपली बळी दिली व शहीद झाले तेव्हा पासून समाजाकडून दरवर्षी २३ नोव्हेंबर रोजी नागपूर येथे महाराष्ट्रातील कान्या कोपऱ्यातून समाज बांधव येऊन स्मरका जवळ येऊन
त्या ठिकाणी सर्व समाज बांधव येऊन आपल चाली रिती नुसार कार्यक्रम करतात.
आदिवासी गोंड/गोवारी विद्यार्थी संघटना तर्फे जागर तरुणाईचा या पुस्तकाचे विर वाहारे प्रदेश अध्यक्ष यांच्या कडून सर्व आदिवासी गोंड/गोवारी विद्यार्थी व समाज बांधव यांना वाटप करण्यात आला तसेच विविध संघटना कडून जेवनाची व्येवस्था करण्यात आली होती.