गाव सहेली,सुविद्या बांबोडे
जिकडे तिकडे शासणाचे,लेक वाचवा अभियान......
उगवत्या कळ्यांना वाचवण्याची,धडपड आहे छान.......
काही विकृत विचारामुळे , संपवली जाते सोन्याची खान........
कितीही कराल तुम्ही, मज संपवण्याचे डाव.......
आईच्या सहमतीने मी, मिळवणार च माझे गावं......
होतील तिला वेदना, मनी तिच्या घाव
येणारच मी इथे, मिळेल तीला मला वाव .... .
ती ही माझ्यासाठी .सदा वाहत असते ऊरी...
पाऊसच जगते ती,कुणा दिसेना मनीच्या सरी....
उमलत्या कळ्यांचे, जगणेच सुंदर स्वच्छंदी
आईच आहे ती ,तिचे समजून मन आनंदी.
सौ. शारदा अतुल भुयार, भालेराव कारंजा लाड जिल्हा वाशिम स्त्री शक्ती मंच संघटना मुख्य कार्यकारी अध्यक्षा