गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मुनिश्वर बोरकर
गडचिरोली : 3 डिसेंबरला कटेझरीत गडचिरोली - पहांदी पारी कुपार गोंडी धर्म प्रचारक महासंघ कटेझरी ' गोंडवाना गोंडी संस्कृती बचाव समिती परसवाडी व पोलिस स्टेशन पोटेगांव यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीविर भगवान बिरसा मुंडा यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आदिवासी सामुहिक विवाह सोहळा तथा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम दि . 3 व ४ डिसेंबर ला गोटुल भुमी कटेझरी येथे आयोजीत करण्यात आलेला आहे.
कोयापुनम ध्वजारोहन तिरु . विनायक मडावी यांचे हस्ते होणार असुन संम्मेलनाचे अध्यक्ष मनिराम दुगा ' जिल्हाध्यक्ष गोंडी धर्म महासंघ ' गडचिरोली ' उद्घाटक माजी आमदार हिरामनजी वरखडे तर चौधरी ' पो . स्टेशन चातगांव ' तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणुन पि एस आय पाटिल ,चातगांव सरपंच गोपाल उईके, चातगाव' नारायण सय्याम माजी सरपंच तर प्रमुख अतिथी म्हणुन बि.डी . मडावी गडचिरोली ,मनोज पेंदाम डॉ. मिलिंद नरोटे,गणेश हलामी, संदिप वरखडे गोंडवाना गणतंत्र पार्टी ,ममता हिचामी, गोगपा , दिपक सुरपाम, महेंद्र मडावी , ग्रामसेवक पिठाले, सरपंच गोपाल उईके चातगांव आदीची उपस्थिती राहणार आहे.
दि . ४ डिसेंबरला होणाऱ्या आदिवासी विवाह सोहळ्यासाठी लागणारे कागपत्र ३० नोव्हेंबर पूर्वी राजु मडावी यांचेकडे आणुन घ्यावे.
कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तिरु. शामराव तुमरेटी ,तिरु प्रताबशहा मडावी तिरु मनोहर ईप्साम, जगादिश तुमरेटी, ज्ञानेश्वर कुमरे, गोडीयन गोटुल समिती गडचिरोली यांनी केलेले आहे .