गाव सहेली, रुचिका वानखडे
महाराष्ट्र/चंद्रपूर : सुविद्या बांबोडे यांना समाजसेवेची आवड असुन त्यांनी अनेक सामाजिक संस्था, गावाकडची बातमी, गाव सहेली मध्ये सहायक संपादक म्हणून कार्यरत आहेत.
महिलांना गाव सहेली व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.गाव सहेली मधुन खरोखरच हे कार्य कौतुकास्पद आहे.
2007ला त्यांची काँग्रेसच्या सचिव म्हणून निवड झाली. मानव अधिकार सहाय्यता संघामध्ये शहराध्यक्ष म्हणून निवड गरीब निर्मूलन समितीमध्ये शहराध्यक्ष म्हणून निवड ,किसान एकता संघ मध्ये शहराध्यक्ष म्हणून निवड, असे अनेक पदे भूषविले आहे त्या शिवाय अनेक संस्थांमध्ये अतिशय उत्तम काम केले.आज करताहेत.
त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन स्त्री शक्ती मंच संघटनेच्या मुख्य कार्यकारी अध्यक्षा शारदा भुयार यांनी त्यांची निवड चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी केली आहे.
स्त्री शक्तिमच संघटनेचा उद्देश तळागाळातील महिलांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना आत्मनिर्धार बनवणे. शासनाच्या अनेक योजना आहे त्याच्या पर्यन्त पोहचवणे.
शहरापासून तर गावापर्यंत प्रत्येक महिला सक्षम करणे हा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व महिलांनी सुविद्या बांबोडे यांच्याशी संपर्क साधावा..