माहूर तालुका काँग्रेस पक्षाची मोठी घोडदौड: आनंद पाटील तुपदाळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश!


• विठ्ठल प्रेमसिंग राठोड यांच्यावर सोपवली जाणार तालुका युवक काँग्रेसची धुरा; माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांची घोषणा




भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे आणि माहूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे यांच्या गतिमान व कुशल नेतृत्वावर दृढ विश्वास ठेवून, आज माहूर तालुक्यातील विविध गावांमधील शेकडो राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या भव्य पक्ष प्रवेश सोहळ्यामुळे माहूर तालुक्यात काँग्रेस पक्षाची ताकद कमालीची वाढ.

हा दिमाखदार पक्ष प्रवेश सोहळा आज माहूर येथे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार मा. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी माहूर तालुक्यातील शेकडो तरुणांनी व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी हातात काँग्रेसचा तिरंगा झेंडा घेऊन पक्षात अधिकृत प्रवेश केला. उपस्थित मान्यवरांनी सर्वांचे पक्षात जाहीर स्वागत करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

युवकांचे संघटन मजबूत करणार:

याच सोहळ्यात नुकतेच काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलेले धडाडीचे तरुण कार्यकर्ते विठ्ठल प्रेमसिंग राठोड यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची जवळगावकर यांची घोषणा. विठ्ठल राठोड यांची कार्यपद्धती आणि युवकांमधील लोकप्रियता लक्षात घेऊन, त्यांच्यावर माहूर तालुका युवक काँग्रेसची (Youth Congress) धुरा सोपवण्याचे निर्देश माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी पक्षीय स्तरावर दिले. विठ्ठल राठोड यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यातील युवक काँग्रेस अधिक आक्रमक आणि सक्रिय होईल, असा विश्वास जवळगावकर यांनी यावेळी व्यक्त केला.

नेतृत्वाचा विश्वास:

यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे म्हणाले की, काँग्रेस पक्षाची विचारधारा हीच सर्वसामान्यांचा विकास करणारी आहे. आज पक्षात प्रवेश केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक दिली जाईल आणि सर्वांच्या सोबतीने माहूर तालुक्यात काँग्रेस पक्ष क्रमांक एकवर आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.



या सोहळ्याला तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नव्याने पक्षात प्रवेश केलेले शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पक्ष प्रवेशामुळे संपूर्ण माहूर तालुक्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे जेस्ट नेते मंचकराव देशमुख, मोहन राठोड, माहूर नगर पंचायतच्या मा. उपनगराध्यक्षा सौ.अश्विनी आनंद पाटील तुपदाळे, राजु भिकू राठोड, राजु सौंदलकर, शेख सादिक, शेख मोबिन, करीम शाह, अजिम सैय्यद, शरीफ शेख, हिमायतनगर चे तालुका अध्यक्ष गजानन सुर्यवंशी, हिमायतनगर चे शहर अध्यक्ष संजय माने, हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्धन ताडेवाड, जिल्हा सचिव पंजाबराव पाटील, काँग्रेस नेते दिलीप पार्डीकर, बाळू पाटील, योगेश चिल्लावार, अरविंद कंटाळे, माहूर काँग्रेसचे विठ्ठल प्रेमशिंग राठोड, उत्तम भिकू राठोड, सावंत बळीराम चव्हाण, रजनीकांत भारत चव्हाण, जीवन उत्तम चव्हाण, आकाश बलवंत चव्हाण, बलदेव गिरधारी, आशिष वसंत राठोड, मंगेश संजय राठोड, अतिष रमेश राठोड, अविनाश प्रकाश जमदाडे, देवानंद कैलास कांबळे, विनोद नथ्थु पाईकराव, नाना गोविंदा कांबळे, मोहन कनिराम आडे, रामसिंग वसराम नाईक, संजय मंगु चव्हाण, प्रदीप उत्तम राठोड, राजू वाघू कांबळे, पंकज गजानन पाईकराव, महेश अरविंद पाईकराव, हिरामण तुकाराम वाघमारे यांच्यासह शेकडो नागरिकांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश घेतला..


Post a Comment

Previous Post Next Post