किनवट काँग्रेस कार्यालयात सरदार पटेल जयंती व इंदिरा गांधी स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
किनवट : तालुका काँग्रेस पक्ष कार्यालयात आज लोहपुरुष, देशाचे माजी गृहमंत्री स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त व देशाच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला काँग्रेसचे शहराध्यक्ष गिरीश नेम्मानीवार यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक कार्यकर्ते संदीप निखाते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिराज जिवानी, माजी नगराध्यक्ष मुर्ती कलगोटूवार, सरचिटणीस अब्दुल खालीदभाई, जिल्हा संघटक शेख फसीभाई, शकील खाजी, कृष्णा पाटील,शेख.सरफराज,फारुख चव्हाण, नरेंद्र दोरटे, कार्यालय सचिव माधवराव खेडकर व माजी नगरसेवक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



