घाटंजी हादरले ! शेतात कापसाच्या आडोशाने गांजाचा मळा ; ४ क्विंटल २१ किलो माल जप्त

 



 

यवतमाळ,घाटंजी -तालुक्यातील कुंभारी शेत शिवारात कपाशी आणि तुरीच्या पिकाआड गांजाची बेकायदेशीर शेती केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.घाटंजी पोलिसांनी या ठिकाणी धडक कारवाई करत सुमारे ४ क्विंटल २१ किलो गांजा जप्त केला आहे. ‌मिळालेल्या माहिती नुसार , कुंभारी येथील एका शेतात कापुस आणि तुरीच्या पिकाआड गांजाची झाडे लावून छुप्या पद्धतीने ही शेती केली जात होती.या शेतात गांजाची झाडे मोठी झाली असून ,त्यांची काढणी सुरू असल्याची गुप्त माहिती घाटंजी पोलीसांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून शेतावर छापा टाकला. ‌या धाडसी कारवाई दरम्यान पोलिसांनी शेतातून गांजाची झाडे उपटून काढली असून , एकुण ४ क्विंटल २१ किलो वजनाचा मुद्देमाल जप्त केला आहे.या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post