गावाकडची बातमी | माहूर-किनवट
पंकज जयस्वाल | मो. 9421367593
माहूरचे तहसीलदार अभिजित जगताप यांनी ७ सप्टेंबर २०२६ रोजी मौजे सिंदखेड येथील मंडळ कार्यालयाला भेट देऊन पीक पाहणी प्रक्रियेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी सिंदखेड शिवारातील शेतात प्रत्यक्ष जाऊन DCS (MH) अॅप्लिकेशनद्वारे स्वतः पीक पाहणी केली.
यावेळी ग्राम महसूल अधिकारी प्रियंका डुकरे, पीक पाहणी सहाय्यक दिनेश नोमुलवार तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते. तहसीलदारांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत पीक पाहणीची प्रत्यक्ष प्रक्रिया आणि नोंदणीबाबत माहिती घेतली.