दुष्काळाची बनावट यादी सोशल मीडियावर व्हायरल बाबत प्रशासनाकडून खुलासा
कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तहसीलदार अभिजीत जगताप यांचे आवाहन
श्रीक्षेत्र माहूर : माहूर तालुक्यासह जिल्ह्यात दुष्काळग्रस्त गावांची यादी जाहीर झाल्याचा दावा करणारी बनावट यादी सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. ही यादी अधिकृत नसून शेतकरी व नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे मार्फत तहसीलदार अभिजीत जगताप यांनी केले आहे.
दुष्काळसदृश परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील पिकांची व पर्जन्यमानाची वस्तुस्थिती तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुष्काळाबाबत शासनस्तरावरून अधिकृत निर्णय झाल्यानंतर संबंधित यादी व आदेश अधिकृत माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येतील.
त्यामुळे सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अप्रमाणित फेक याद्यांवर विश्वास ठेवू नये तसेच त्या पुढे प्रसारित करू नयेत असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे मार्फत तहसीलदार अभिजीत जगताप यांनी केले आहे .

